मनात कसलतरी विचार थैमान घालतोय..
स्वता: ला काहीतरी सांगायचाय..
विचारांच थैमान थांबवायचाय....
कसा .?? ह्याचा विचार अजून करायचाय..
शबांच्या तबकडी मधे बसून..
मला कुठेतरी मला फिरायचाय..
कुठे ?? हे अजुन ठरवायचाय..
जीवनात संघर्ष असतोच ..
पण "संघर्ष" हेच जीवन असेल तर..!
कस..जगायच ! हे अजुन ठरवायचाय..
मी गर्दीत असून एकटा आहे ..
गर्दीतून मार्ग शोधत आहे ...
बस्स !! आता कुठेतरी मला थांबायचाय ..
कुठे ?? हे अजुन ठरवायचाय..
सर्वांच शेवटाच दे एकच ..
फक्त मार्ग मात्र वेगळे .
मला माझा मार्ग शोधायचाय ..
कसा .?? ह्याचा विचार अजून करायचाय..
कोणता तरी निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय..
कोणता ?? ह्याचा बिचार करतोय..
का कुणास माहीत ??
निराशेच्या जाळ्यात इतका गुरफटून जातोय..
आणि त्यामधून बाहेर पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय..???
--संदीप स्वामी
९४२१२२५२२२
No comments:
Post a Comment